ढेबेवाडी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या १० जून रोजी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

पक्षाने नेहमीच विविध उपक्रम आणि धोरणांमधून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे या वर्धापन दिनानिमित्तदेखील तालुका तसेच गावपातळीवर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 ढेबेवाडी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधत काळगाव कुंभारगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शाळा व कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावीच्या सन 2022 - 23 च्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 तळमावले येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रमेश मोरे बापू यांनी दिली आहे.