समाजसेवक अनिल मोरे यांचा उद्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने होणार साजरा.


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
किसन नगर ठाणे शिवसेना शाखा प्रमुख अनिल मोरे यांचा उद्या दि.16 रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू व ना.शंभूराज देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून अनिल राजाराम मोरे दादा यांची ओळख आहे. वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा शेंडेवाडी व कृष्णा हॉस्पिटल कराड यांचे संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीरीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर शेंडेवाडी जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित केले आहे.

शिबिरीसाठी तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे तरी कुंभारगाव भागातील सर्व लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शिवसेना शाखा शेंडेवाडी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

 यावेळी संपूर्ण शेंडेवाडीत वृक्ष वाटप व हॉलीबॉल मैदानाचे उदघाटन असा संयुक्त समारंभ संपन्न होणार आहे.