कुंभारगाव येथील श्री लक्ष्मीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.
कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
तळमावले केंद्रात श्री लक्ष्मी देवी हायस्कुलच्या विद्यार्थ्यानी निकालाची परंपरा कायम राखत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याही वर्षी विद्यालयाच्या अशा पल्लवीत करून विद्यालयाचे नावलौकिकात अधिक भर घालून निकालाच्या इतिहासामध्ये सातत्य राखणेत यशस्वी झाले. श्री लक्ष्मीदेवी हायस्कूलचा निकाल 93.54% लागला आहे.

प्रथम तीन क्रमांक :
1) कु. मोरे श्रद्धा दिपक : 94.60%
2) कु. सागरे ऋतुजा महेंद्र : 83.60
3) लोकरे गणेश प्रविण : 77.80%               

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांचे वतीने व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.