उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे करपेवाडी व साईकडे गावात उत्साहात स्वागत.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना करपेवडीचे सरपंच रमेश नावडकर व ग्रामस्थ.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज त्यांनी कराड पाटण तालुक्यातील अनेक गावांना भेट दिली.या वेळी मलकापूर येथे भाजपा कोअर कमिटी ची बैठक पार पडली.

या नंतर पाटण तालुक्यातील तळमावले विभागातील करपेवाडी व साईकडे गावाला त्यांनी भेट दिली. करपेवाडी गावचे सरपंच रमेश नावडकर व सर्व ग्रामस्थांनी करपेवाडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत केले. 

करपेवाडी गावास विविध विकास कामांसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल सरपंच रमेश नावडकर व ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून आभार मानले व गावात स्वागत केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना तळमावलेचे सरपंच सुरज यादव.

या वेळी त्यांनी तळमावले साईकडे येथे ही भेट दिली. तळमावलेचे सरपंच सुरज यादव ग्रामस्थ व सर्व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्साहात स्वागत केले.

यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईकडे गावचे युवा नेते महेंद्र मोरे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.