कराड दक्षिण हादरले !! उंडाळे विभागात चोरट्यांचा धुमाकूळ.

काल रात्री ओंड,उंडाळे, टाळगाव, काले फाटा या विभागात चोरट्यानी अनेक घरे फोडली; ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण.



उंडाळे| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कराड दक्षिणच्या डोंगरी भागात शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ओंड, उंडाळे, टाळगाव, कालेफाटा या विभागात पंधरा ते वीस घरे अज्ञात चोरट्यानी फोडली घराची कुलपे तोडून घरातील साहित्याची नासधूस करत मौल्यवान वस्तू सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केेेली   

अज्ञात चोरटे भारी किमतीच्या गाड्यावरून गावागावात शिरून बंद असलेल्या घराची कुलपे तोडून या घरात प्रवेश करत घरातील सर्व साहित्याची नासधूस करत हाताला लागेल त्या मौल्यवान वस्तू पैसे  चोरून नेले अज्ञात चोरट्याने उंडाळे येथे पोलीस इन्स्पेक्टर महेंद्र पाटील यांच्या घराला लक्ष केले त्यांच्या घरातील तीन ते चार हजार रुपये व पैसे साठवण्यासाठी केलेली भिशी चोरट्या नी लंपास केली याशिवाय उंडाळे गावचे पोलीस पाटील यांच्या दोन्ही चुलत्यांची घरी चोरट्याने लक्ष केले ही दोन्ही घरे बंद होती याशिवाय एलबीएस कॉलेजचे प्राचार्य संजय पाटील यांचेही घर फोडले.

• Advertisement 


अज्ञात चोरट्यांच्या चोरी वेळी स्थानिक ग्रामस्थांनी आरडाओरडा केला परंतु चोरट्याने आरडाओरडा करणाऱ्यांच्या तोंडावर बॅटरी पाडून त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शेजारी असणारे लोक जागे होऊनही भीतीपोटी बाहेर पडले नाहीत. अज्ञात चोरट्याने उंडाळे सह अन्य गावात हैदोस घातला उंडाळे सह येळगाव येथे सात घरे अज्ञात चोरट्यानी फोडली यामध्ये अशोक गायकवाड व त्यांचे बंधू यांची घरे ही फोडली.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी सात ठिकाणी घरफोडी करुन रोकड,सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारून अंधाराचा फायदा घेत पोबारा केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.            

 सुप्रसिद्ध सोनेचांदीचे व्यापारी वर्दीचंद नवलमन गांधी, झुंजार बाजीराव पाटील, डॉ. आनंदा बाळू सोरटे,तानाजी बापूराव मस्कर,पोपट गणपती पाटील, विजयकुमार भगवान पाटील, आनंदा राजाराम पाटील यांच्या घरांची समोरच्या बाजूने मुख्य दरवाजांची कुलुपे कापून घरात प्रवेश केला मात्र त्यापूर्वी शेजारच्या घरांमधील लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून त्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या तद्नंतर संबंधित घरातील कपाटे,तिजोरीवर प्रहार करीत कपाटातील सोनेचांदीचे दागिने,रोकड तसेच मोल्यवान वस्तू घेऊन अंधाराचा फायदा घेत पोबारा केल्याने येळगांव मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे घटना घडली त्यादरम्यान विद्युत पुरवठाही खंडित होता.

 पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावून बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे.