महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार अनिता चव्हाण व लीलावती काळे यांना प्रदान.


सौ.अनिता हरेश्वर चव्हाण यांना पुरस्कार देताना उपसरपंच जोतीराज काळे, ग्रामसेवक अनिल जाधव, सदस्या सौ. कल्पना देसाई व इतर अंगणवाडी सेविका.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सन 2023-2024 या वर्षात सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी व योगदानाबद्दल ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पानवळवाडी मालदन येथीलअंगणवाडी सेविका सौ. अनिता हरेश्वर चव्हाण व श्रीमती. लीलावती काळे यांना प्रदान करण्यात आला. दि. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हे पुरस्कार वितरण करण्यात आले.

मालदन ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी व योगदानाबद्दल अंगणवाडी सेविका सौ. अनिता हरेश्वर चव्हाण व श्रीमती. लीलावती काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे गौरव पत्र, धनादेश,सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देवून या दोन्ही पुरस्कार प्राप्त महिलांना गौरवण्यात आले.



श्रीमती. लीलावती काळे यांना पुरस्कार देताना मान्यवर.

सदर पुरस्काराचे वितरण मालदन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या वेळी उपसरपंच जोतीराज काळे, ग्रामसेवक अनिल जाधव, सदस्या सौ. कल्पना देसाई व इतर अंगणवाडी सेविका यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गावच्या सरपंच सौ.गीतांजली काळे, उपसरपंच जोतीराज काळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, युवा नेते प्राध्यापक यशवंत काळे, नितिन काळे, मालदन विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळ जाधववाडी, पानवळवाडी , शिवशक्ती विकास मंच, सावित्री प्रतिष्ठान पानवळवाडी यांनी विशेष अभिनंदन केले 

तसेच दैनिक कृष्णाकाठ संपादक चंद्रकांत चव्हाण व कृष्णाकाठ न्यूज चॅनेल च्या वतीने कृष्णाकाठ परिवाराच्या माध्यमातून दोन्ही पुरस्कार प्राप्त महिलांना गौरवण्यात आले व त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर समाजातील विविध स्तरातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.