बनपूरी नळ पाणी पुरवठा योजनेची विहीर वांग नदीच्या रेड झोन मध्ये; शेती बुडण्याचा धोका, शेतकरी आक्रमक.


बनपूरी ता.पाटण जलजीवन मिशन योजनेंतर्गत वांग नदीपात्रात काढलेल्या विहीरीची पाहणी करतांना कोयना सिंचन,व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी व ग्रामस्थ वगैरे.

सणबुर | प्रमोद पाटील :
बनपुरी ता.पाटण येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेची विहिर वांग नदीच्या ब्लु व रेड झोनमध्ये पुरेषेच्या आत येत असल्याने ते अनधिकृत असल्याचा निष्कर्ष कोयना सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काढला असून स्थानिक शेतकऱ्यांनी विहिरीमुळे निर्माण होणाऱ्या फुगवट्यात आमची शेती बुडण्याच्या धोक्याची व तसे घडल्यास आत्मदहनाचा तक्रार वजा इशारा संबधित विभागास दिला आहे.

              याबाबत संबधित तक्रारदार शेतकऱ्यांनी कोयना सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे लेखी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलेआहे कीग्रामपंचायत बनपुरी यांनी सातारा लोकसभेचे खास. व माजी पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बनपुरी गावासाठी 1 कोटी 97 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. नंतर ग्रामपंचायतीने कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने विहिर कामकेले आहे काम सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी घेतलेली नाही.

      आम्ही कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग यांना 9 जून रोजी आमचा तक्रारी अर्ज दाखल दिल्यानंतर सिंचन विभागाचे श्रेणी दोनचे अभियंता राहुल बामणे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अविनाश व्यवाहारे हे 16 जून रोजी या विहिरीची पाहणी करण्यासाठी आले असता विहिरीचे बांधकाम पूर्णपणे वांग नदीपात्रामध्ये येत असून शासन परिपत्रकानुसार क्र.पु.र.नी 2018 (182)/2018 सिंचन व महसूल विभागाच्या अंतर्गत निर्णयानुसार ते वांग नदीच्या लाल व निळ्या पुर रेषेमध्ये येत आहे त्यामुळे हे बांधकाम पूर्ण अनधिकृत आहे असा निष्कर्ष काढला आहे.

      सदर विहीर 80 % नदीपात्रात मध्ये आहे त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी विहिरीला धडकून पाठीमागे फुगी निर्माण होऊन ते पाणी गट नंबर 25, 26, व 32 हे गट नंबरच्या शेतीत घुसून ही शेती पूर्णपणे बाधित होणार आहे त्यामुळे आमची पिके नष्ट होण्याचा निर्माण झाला आहे. 

          नदिपात्र आणि परिसराचा अंदाज घेऊन विहिरीची जागा निवडणे क्रमप्राप्त होते तसे न केल्यामुळे आमच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण ?असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित करूनआम्हाला न्याय मिळावा अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

     या अर्जावर संदीप श्रीरंग पवार, सुरेश भगवान पाटील, सुरेश बाबुराव पवार, तुकाराम श्रीपती पवार यांच्या सह 15 शेतकऱ्यांच्या सह्या असून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करणार आहे असा इशारा निवेदनात त्यांनी कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग यांना दिला आहे.