घोगांव मध्ये अवतरली साक्षात पंढरीची वारी

 


घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

     ग्रामीण विकास शिक्षण संस्था,उंडाळेचे श्री.बाळसिद्ध विद्यालय घोगाव तालुका कराड या विद्यालयामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त शाळेतील मुला मुलींचे शालेय आषाढी दिंडी चे आयोजन केलेले होते.त्यामध्ये गावातील श्री.बाळसिद्ध भजनी मंडळातील तबला वादक जयवंत सुतार महाराज,पकवाज वादक आनंदा साळुंखे महाराज,हार्मोनियम वादक जगन्नाथ साळुंखे महाराज प्रवीण सावंत महाराज, शहाजी पाटील महाराज,डॉ.प्रकाश पाटील महाराज यांनी दिंडीची सर्व धुरा सक्षमपणाने सांभाळली.श्रींची पालखी,पताका ही होत्या.तुळशी वृंदावने,पाण्याच्या कळशा विद्यार्थी-विद्यार्थीनी घेउन आलेल्या होत्या. मुला-मुलींबरोबरच महिलांनीही माऊलींचा जयजय कार करत अभंगावर ठेका धरला. अथर्व शेवाळे याने विठ्ठल साकारलेला होता व आर्या भेदाटे या विद्यार्थिनी ने रुक्मिणी साकारलेली होती. प्रथमेश भेदाटे याने तुकाराम महाराजांचा वेश धारण केला होता. सर्व मुलं व मुलींनी वारकरी वेश परिधान केलेला होता.संपूर्ण गावात विठुरायाचा गजर करत दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.श्री.बाळसिद्ध विद्यालय घोगांव चे मुख्याध्यापक हणमंत सूर्यवंशी यांनी या दिंडीचे आयोजन केले होते.सांकृतिक विभाग प्रमुख जयश्री पाटील यांनी दिंडीचे नियोजन केले.दशरथ जाधव, दिनकर अंबवडे, गणेश तपासे रूपाली महाडिक भीमराव भोसले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. विद्यार्थी विद्यार्थिनी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.