महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सौ.रेश्मा डाकवे यांना प्रदान.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सन 2023-2024 या वर्षात सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी व योगदानाबद्दल ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सौ.रेश्मा संदीप डाकवे यांना प्रदान करण्यात आला.

सौ.रेश्मा डाकवे ह्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव आहेत. त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. या कार्याची दखल घेत त्यांना सदर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे गौरव पत्र, सन्मान चिन्ह, धनादेश, शाल व श्रीफळ देवून सौ.रेश्मा डाकवे यांना पुरस्कार देण्यात आला.

या वेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.सिताबाई डाकवे, सौ.माया साळुंखे, लिलाबाई डाकवे, तारुबाई डाकवे, नंदा चिंचुलकर, सौ.पवळे, शामराव डाकवे, शंकर डाकवे, बाळू डाकवे व डाकेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सौ.रेश्मा डाकवे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.