महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी मलकापूर येथे भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली.
या नंतर कराड येथील कल्याणी ग्राउंड येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य लाभार्थी संमेलन व जाहिर सभा उदंड गर्दीत, उत्साहात संपन्न झाली.
या वेळी सभेला उपस्थित असलेल्या नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्साह अमाप होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शक्तीकेंद्रप्रमुख, तालुका प्रवक्ता, विंग गावचे उपसरपंच सचिन पाचपुते यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सचिन पाचपुते हे डॉ.अतुल भोसले यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. विंग जिल्हा परिषद मतदार संघात त्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.
त्यांच्या पक्ष वाढी संदर्भात केलेल्या कार्याची भाजपा वरिष्ठ नेत्यांनी दखल घेऊन त्यांचा विशेष गौरव केला आहे.