संजय गांधी निराधारच्या तालुकाध्यक्षपदी भरत साळुंखे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड


चाफळ | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
संजय गांधी निराधार योजनेच्या पाटण तालुकाध्यक्षपदी चाफळ विभागातील युवा नेते भरत साळुंखे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखली सर्वसामान्य निराधारांची कामे परत एकदा जोमाने करणार असल्याचे निवडीनंतर भरत साळुंखे यांनी सांगितले. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत विधवा महिला, अपंग, निराधार, परितक्त्या तसेच विम्याची प्रकरणे मार्गी लावून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या प्रयत्न भरत साळुंखे यांनी केल्यामुळेच त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल मंत्री शंभुराज देसाई, रविराज देसाई, यशराज देसाई, डि.वाय. पाटील, राजाराम पाटील, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील, जगन्नाथ साळुंखे, उत्तमराव साळुंखे, शिवाजी बोंगाणे, मनोहर कडव, गोरख चव्हाण, सतीश पवार, निवृती पवार, उमेश पवार, संजय यादव यांच्यासह चाफळ विभागातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.