हर्षवर्धन शेजवळ यांची नवोदयसाठी निवड

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचा विदयार्थी कु.हर्षवर्धन सतिश शेजवळ यांची केंद्रीय नवोदय विदयालय सातारा येथे नुकतीच निवड झाली असून तो मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी शेती अधिकारी श्री.डी.एम शेजवळ यांचा नातू आहे.या निवडीबद्दल हर्षवर्धनचे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्ह्यांचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईसाहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा,युवा नेते जयराज देसाई,आदित्यराज देसाई, विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे ,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री.एन.एस.कुंभार,तसेच विदयालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,व आजी-माजी विदयार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.