शिवदौलत सहकारी बँकेच्या ढेबेवाडी शाखेचे स्व-मालकीच्या नूतन वास्तूत स्थलांतर झाले. हा स्थलांतर समारंभ महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी ना. शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सहकार क्षेत्रात कार्यरत राहताना सहकाराची म्हणून एक शिस्त पाळायची असते. याचा आदर्श आपल्याला लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांनी घालून दिलेला आहे. त्यामुळे आजवर आम्ही बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप टाळला आहे. बँकेने कामकाजाची शिस्त पाळत विस्तार करावा, असाच आमचा प्रयत्न असतो आणि यापुढेही राहील, अशी भावना ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सभासदांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे. विविध शासकीय योजनांंचा लाभ नागरिकांना बँकेच्या माध्यमातून देण्यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे, अशा सूचना यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी केल्या. तसेच ढेबेवाडी शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर झाल्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे ना. शंभूराज देसाई यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराजदादा देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराजदादा देसाई यांच्यासह शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन संजय देशमुख, व्हा. चेअरमन कुसुम मोहिते, माजी चेअरमन ॲड. मिलिंद पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण तसेच सर्व संचालक, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.