पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण विधानसभा मतदारसंघातर्फे पाटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा) यांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब यांना सोशल मीडियातून दिलेल्या धमकीचा निषेध करण्यात आला.

 तसेच पाटण येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व पक्षाचे , संस्थांचे आजी/माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, आजी/माजी जि.प/पं.स. सदस्य, आजी/माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.