आदर्श ज्युनिअर कॉलेज व आ.च. विद्यालय मलकापूर येथे आज "आंतरराष्ट्रीय योग दिन " उत्साहात संपन्न.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित आदर्श ज्युनियर कॉलेज व आ. च. विद्यालय, मलकापूर येथे विविध योग प्रात्यक्षिकांसहआंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.

       क्रीडा शिक्षक श्री जे.एन. कराळे यांंनी विविध योगांचे प्रकार त्यांचे प्रात्यक्षिके करून दाखवून ते विद्यार्थ्यांच्याकडूनही करवून घेतली. यासाठी श्री ज्ञानदेव कवळे, श्री पी डी खाडे यांचे योग प्रात्यक्षिके करण्यासाठी मार्गदर्शन लाभले. 

     योग दिनाचे औचित्य साधून श्री ज्ञानदेव कवळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील योगाचे महत्त्व समजावून दिले. योगानेच आपले जीवन अधिक समृद्ध होते. योगानेच मनाची एकाग्रता साधता येते ही एकाग्रता विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आर के राठोड यांनी केले तसेच सर्व उपस्थितांचे आभार श्री शरद तांबवेकर यांनी मानले.

       यावेळी 19 महाराष्ट्र बटालियनचे श्री.पी.डी खाडे, एनसीसी चे सर्व कॅडेट, प्राचार्या सौ.अरुणा कुंभार उपमुख्याध्यापक ए.बी.थोरात पर्यवेक्षक बी.जी.बुरुंगले, आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख सौ.शीला पाटील,सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.