ब्रिलियंट कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे एमएचटी सीईटी परीक्षेत देखील भरघोस यश


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
        राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड च्या विद्यार्थ्यांनी एम एच टी परीक्षेत अतिशय उत्तुंग यश संपादित केले आहे. येथील विध्यार्थी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी कॉलेज मध्ये प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.

  उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंट च्या विद्यार्थ्यांनी (फक्त कराड येथील एकाच शाखेतून) पुढील प्रमाणे अतिशय घवघवीत यश संपादित केले आहे, आशिष दोंत ९९.७८ पर्सेन्टाइल, श्रेया पाटील ९९.३७ पर्सेन्टाइल , प्रणव खोंडे ९९.३७ पर्सेन्टाइल, कल्पेश पाटील ९९.२४ ,स्वराज जाधव ९९.११, अथर्व गवळी ९८.८४ पर्सेन्टाइल , कांचन बोचरे ९८.७८ पर्सेन्टाइल , पवार शैलेश ९८.७६, मुल्ला सानिया ९८.४९,रोहित बनकर ९८.२४ पर्सेन्टाइल, भोईर श्रीदत्त ९८.७६, विश्वदीप सुतार ९७.९८, पाटील संस्कृती ९७.५८, पाटील साईराज ९७.०२, पाटील वेदांत ९६.७९, सपकाळ अवधूत ९६.२३, छापे विकास ९५.५९, कदम दीपाली ९५.४८, जाधव समृद्धी ९५.४४ कारंडे प्रतीक ९५.४३, देशपांडे वेदांत ९४.४०, वरद घोलप ९३.५० पर्सेन्टाइल, सफा मुल्ला ९३.३७, दिंडे शर्वरी ९३.०० पर्सेन्टाइल,यादव ओंकार ९३.००, देशमुख भाग्यश्री ९२.७३, शिंदे विवेक ९१.८३, झेंडे अंकिता ९१.००, नलवडे पाटील श्रेया ९०.९९, अशाप्रकारे ४५ विद्यार्थ्यांना ९० पर्सेन्टाइल च्या पुढे मार्क्स मिळाले आहेत, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या संचालक मंडळाने व ज्ञान विज्ञान संस्कार प्रबोधिनी ओगलेवाडी चे संचालक सय्यद सर आणि न्यू ईंग्लिश स्कुल सदाशिवगड चे मुख्याध्यापक आधिकराव डुबल सर यांनी केले आहे. 

         जेईई मेन्स व ॲडव्हान्सड मधील हमखास निकालाची परंपरा असणाऱ्या या कॉलेज मध्ये सी ई टी परीक्षेत देखील भरघोस यश संपादित केले आहे साठी स्वतंत्र व कायमस्वरूपी स्टाफ, प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ११ वी पासूनच नियमित अध्यापन , दररोज चालणारा ५ ते ६ तास स्टडी व डाउट सेशन, नियमित टेस्ट, दर्जेदार स्टडी मटेरियल, वैयक्तिक लक्ष, मर्यादित विद्यार्थी संख्या, स्मार्ट बोर्ड द्वारे अध्यापन ई. मुळे केवळ ब्रिलियंट चे विद्यार्थी एवढे उत्तुंग यश संपादित करू शकत आहेत. 

   या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या खात्रीशीर पायाभरणीसाठी ८ वी ते १० वी ब्रिलियंट पब्लिक स्कूल, कराड ची सुरुवात झाली असून पहिल्याच वर्षी प्रचंड प्रतिसाद असून मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत, तसेच ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट विकेंड फाऊंडेशन ची सोय देखील आहे.

लवकरच कॉलेज व स्कूल चे स्वतः च्या जागेत स्थलांतर होत आहे ८ वी ते १२ वी च्या वर्गासाठी प्रवेश सुरु असून पालकांनी आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी, निकालाची परंपरा हमखास असणाऱ्या जिल्ह्यातील या अकॅडमी , पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.