चेंबूरच्या घाटले गावदेवी मैदानात आज भव्य रक्तदान शिबीर

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

थॅलेसेमिया या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता या आजारातील रूग्णांना पुरेसा रक्तपुरवठा मिळावा म्हणून आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी चेंबूरमधील घाटले गावदेवी मैदानातील हॉलमध्ये रविवार ११ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 

श्रीमती सुजाता रायकर यांच्या 'साथ " या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होणार्‍या या रक्तदान शिबिराला प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने,आमदार सचिन अहिर,आमदार प्रकाश फातर्पेकर,विभाग प्रमुख प्रमोद शिंदे,विभाग संघटिका रिटा वाघ समाजसेविका मीनाक्षी पाटणकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कलाकार हजेरी लावणार आहेत.विशेष म्हणजे सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष व अभिनेता सुदेश बांदेकर,अभिनेता विजय गोखले,भाऊ कदम, भारत गणेशपुरे,गणेश मयेकर अभिजीत थोरात आदींनीही इच्छुक रक्तदात्यांना या शिबिरात आपले योगदान देण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, शिबिराच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवार १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.