कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.

उज्वला माने व समीजा मुल्ला या पुरस्काराने सन्मानित.कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सन 2023-2024 या वर्षात सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी व योगदानाबद्दल ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे काल दि. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हे पुरस्कार वितरण करण्यात आले.
कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी व योगदानाबद्दल अंगणवाडी सेविका सौ.  उज्वला पोपट माने व समीजा अजीज मुल्ला यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.  

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे गौरव पत्र, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देवून यांना गौरवण्यात आले.

सदर पुरस्काराचे वितरण कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या वेळी उपसरपंच राजेंद्र चव्हाण,  ग्रामसेवक अनिल जाधव,   वि.का. सेवा सोसायटीचे संचालक राजेंद्र पुजारी तसेच जयवंतराव चव्हाण उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  ग्रामसेवक अनिल जाधव यांनी केले तर आभार उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी मानले.