19 MAH BN NCC कराड यांचेमार्फत आज "आंतरराष्ट्रीय योग दिन " उत्साहात साजरा....


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
प्रतिसंगम कृष्णाघाट,कराड येथे योगा प्रात्यक्षिक करण्यासाठी कराड येथील टिळक हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, यशवंत हायस्कूल, विठामाता विद्यालय, आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर, बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड.
या शाळा व महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा प्रात्यक्षिके सादर केली. यासाठी पतंजली योगसाधक यांचे तर्फे श्री पी व्ही जाधव, श्री अनिल पटेल, श्री संतोष माने, श्री बाळासो पवार, श्री राहुल किरदक, श्री सुनील कचरे, श्री बाळासो भोसले यांचे योगा प्रात्यक्षिके करण्यासाठी मार्गदर्शन लाभले.
 यावेळी 19 महाराष्ट्र बटालियन कराडचे PI स्टाफ हावलदार श्री विक्रम पाटील, ANO-श्री. व्ही.एस .सावंत, श्री पाटील एमआर.,श्री आर के ठाकरे, श्री खाडे, श्री कोळी CTO- सौ चव्हाण एम यु., कु. वरेकर स्नेहल यशवंत हायस्कूल कराड चे झुंजार सर, बापूजी साळुंखे कॉलेज चे प्राचार्य इत्यादी उपस्थित होते.