आ.च.विद्यालय,मलकापूरचा 10 वीचा निकाल 99.48
कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित आ. च. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मलकापूर निकालाची परंपरा कायम राखत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याही वर्षी विद्यालयाच्या अशा पल्लवीत करून विद्यालयाचे नावलौकिकात अधिक भर घालून निकालाच्या इतिहासामध्ये सातत्य राखणेत यशस्वी झाले..

     विद्यालयातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी:-

1) गावडे आशिष दीपक व शिर्के विवेक दिलीप- 95.60% ,

 2) काकडे सुयश कृष्णा-94.80%, 

3) पाटील श्रीदत्त नानासाहेब - 94.60%, 

4) कोळी ओंकार धनाजी- 94.00%

 5) बोंद्रे सोहम सागर व पाटील सुजल प्रकाश- 92.20% 

विशेष योग्यता 68 ,तर प्रथम श्रेणी 74, द्वितीय श्रेणी46, तृतीय श्रेणीत 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

          या सर्व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचे श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव शेती मित्र अशोकराव थोरात,सर्व संचालक, मुख्याध्यापिका, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, आदर्श जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक, ग्रामस्थ यांचे वतीने व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करणेत आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.