सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. 13 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 13 मे 2023 रोजी सकाळी 10.40 वा. दौलतनगर ता. पाटण येथे आगमन. सकाळी 10.50 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण व विनम्र अभिवादन. सकाळी 10.55 वा. स्व. शिवाजीराव देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण व विनम्र अभिवादन. सकाळी 11 वा. ते 2 वा. पर्यंत श्रीमती विजयदेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स विद्यालय, दौलतनगर, ता. पाटण येथे महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन, शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ व लाभार्थिंना प्रातिनिधीक स्वरुपात लाभवस्तू व प्रमाणपत्रांचे वाटप व अपंग सर्वेक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन, पंडीत दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा. दुपारी 2 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा.
मोटारीने दौलतनगर हेलिपॅड ता. पाटणकडे प्रयाण. दुपारी 2.40 वा. दौलतनगर हेलिपॅड ता. पाटण येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.