राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्काराने डाॅ.संदीप डाकवे सन्मानित.तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य (कार्यक्षेत्र ऑल इंडिया) सातारा जिल्हा व चंद्रभागा रुरल डेव्हलपर यांच्या वतीने डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

व्यसनमुक्ती या एकाच विषयावर एकाच दैनिकात एका वर्षात पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी जास्तीत जास्त लेख लिहून ते प्रसिध्द केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. सुप्रसिध्द अभिनेत्री सुरेखा कुडची, बिग बाॅस फेम तृप्ती देसाई, रुरल डेव्हलपरचे दिपक लोखंडे, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, काॅंग्रेसचे युवा नेते इंद्रजित चव्हाण, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अपर्णा लोखंडे, सुदर्शना थोरवडे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संघटक पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

दरम्यान डाॅ.संदीप डाकवे यांनी यावेळी सुरेखा कुडची यांना त्यांचे स्केच तर तृप्ती देसाई, दीपक लोखंडे यांना त्यांच्या नावाचा अक्षरगणेशा भेट दिला.

पत्रकारिता, कला आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी शेकडो नावीण्यापूर्ण उपक्रम राबवले आहेत.

डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.