एल पी यू नेस्ट परीक्षेत ब्रिलियंट ची श्रेया सातारा जिल्ह्यात प्रथम व देशात ५८ वी


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
 राष्ट्रीय पातळीवर एन आय आर एफ नुसार रँक 47 असणाऱ्या एल पी यू नेस्ट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड चे 8 विद्यार्थी बसले होते सर्व विद्यार्थी अतिशय उत्तम रँक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये श्रेया पाटील सातारा जिल्ह्यात १ ली व देशात ५८ वी आली आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंट च्या विद्यार्थ्यांनी (फक्त कराड येथील एकाच शाखेतून) एल पी यू नेस्ट परीक्षेत पुढील प्रमाणे अतिशय घवघवीत यश संपादित केले आहे.त्यामध्ये श्रेया पाटील ऑल इंडिया रँक 58, , कल्पेश पाटील ऑल इंडिया रँक 89, आशिष दोन्थ ऑल इंडिया रँक 94 , रोहित बनकर ऑल इंडिया रँक 135, प्रणव खोंडे ऑल इंडिया रँक 1001, अथर्व गवळी ऑल इंडिया रँक 1100, कांचन बोचरे ऑल इंडिया रँक 1056, प्रतीक थोरात ऑल इंडिया रँक 1204. सर्व विध्यार्थ्यांना ५० टक्के स्कॉलरशिप मिळाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे. 

या कॉलेज च्या २०१९ च्या शैक्षणिक वर्षात शिकणारी संजना संजीव पाटील हि विद्यार्थिनी एल पी यू पंजाब या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून सध्या मोठ्या पगारासह अमेझॉन मध्ये जॉब करत आहे. जेईई ॲडव्हान्सड ची तयारी करून घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आय आय टी मध्ये प्रवेश मिळवून देणारी ही कराड मधील एकमेव अकॅडमी आहे. जेईई मेन्स व ॲडव्हान्सड साठी स्वतंत्र व कायमस्वरूपी स्टाफ, प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी 11 वी पासूनच नियमित अध्यापन, दररोज चालणारा 5 ते 6 तास स्टडी व डाउट सेशन, नियमित टेस्ट, दर्जेदार स्टडी मटेरियल, वैयक्तिक लक्ष, मर्यादित विद्यार्थी संख्या ई. मुळे केवळ ब्रिलियंट चे विद्यार्थी एवढे उत्तुंग यश संपादित करू शकत आहेत. 

   या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या खात्रीशीर पायाभरणीसाठी 8 वी ते 10 वी ब्रिलियंट पब्लिक स्कूल, कराड ची सुरुवात झाली असून पहिल्याच वर्षी प्रचंड प्रतिसाद असून मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत, तसेच 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट विकेंड फाऊंडेशन ची सोय देखील आहे.

8 वी ते 12 वी च्या वर्गासाठी प्रवेश सुरु असून पालकांनी आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी, निकालाची परंपरा हमखास असणाऱ्या जिल्ह्यातील या अकॅडमी, पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे. दर रविवारी सकाळी ११ वाजता ‘ मोफत करीयर मार्गदर्शन सेमिनार ’ आयोजित केला जातो, त्यामध्ये ब्रिलियंट चे प्रख्यात आय आय टी एन फॅकल्टी आदित्य रंजन सर हे करियर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा लाभ सर्व पालकांनी विद्यार्थ्यासमवेत घ्यावा.