श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अजित थोरात तर व्हा.चेअरमनपदी चंद्रकांत टंकसाळे यांची निवड.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जखिणवाडी ता.कराड जि. सातारा या संस्थेच्या सन २०२२-२३ ते २०२७-२८ पाच वर्षासाठी चेअरमनपदी मा. अजित जोतिराम थोरात व व्हा. चेअरमनपदी चंद्रकांत सखाराम टंकसाळे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीचे अध्यासी अधिकारी म्हणून उप निबंधक व निवडणुक अधिकारीसो श्री. संदीप जाधव यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात, पी. जी. पाटील, वसंतराव चव्हाण, मारूती रावते, दत्तात्रय लावंड, दगडू पवार, गणपराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

        अशोकराव थोरात म्हणाले सहकार क्षेत्रामध्ये विशेषत: पतसंस्था क्षेत्रात अनिश्चितीचे वातावरण असताना श्री मळाईदेवी पतसंस्थेने विश्वासार्ह, पारदर्शक व ग्राहकाभिमुख कारभाराव्दारे उल्लेखनिय प्रगती करून, सातारा जिल्हयातील पतसंस्थांपुढे आदर्श निर्माण केला आहे. संचालक मंडळाने एकसंघपणे व ग्राहकांच्या हिताचा विचार केला असून, सातत्याने तत्पर व विनम्र सेवेला प्राधान्य दिले आहे. याच्या जोरावर चालू आर्थिक वर्षात १३२ कोटी ठेवी व ९३ कोटीचे कर्ज वाटप केलेले असुन एकुण २२५ कोटीचा व्यवसाय व १ कोटी ८५ लाख नफा झाला आहे. तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र सातारा जिल्हा असून, नविन शाखा सुरू करणे, सर्व शाखामधून लॉकर्स सुविधा उपलब्ध करणे त्याचबरोबर ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत विविध प्रकारच्या बँकिग सेवा पुरविणेचे दृष्टीकोनातून सी.बी.एस. प्रणाली सुरू करणेत आलेली आहे. 

       चेअरमन अजित जोतिराम थोरात म्हणाले संस्थापक मा. अशोकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आणि संचालक मंडळ व सल्लागार मंडळाच्या सहकार्यामुळे मी व व्हा. चेअरमन चंद्रकांत सखाराम टंकसाळे चांगले काम करून सभासद, ग्राहक व हितचिंतक यांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करू. संस्थेने महाराष्ट्रातील गरीब, शेतकरी कष्टकरी, सामान्य जनतेचे हित साधले आहे. सहकारी संस्था अडचणीत आणण्याचे काम काही घटकाकडून सुरू आहे. आर्थिक उलाढालीबरोबरच संस्था सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असते. आपला भारत देश कृषी प्रधान देश असून, अर्थव्यवस्थेचा तो कणा आहे. म्हणून शेतक-यांच्या उन्नतीसाठी मळाई ग्रुप व मळाई ग्रुपमधील एक घटक म्हणून मळाईदेवी पतसंस्थेचा विविध उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग असतो. शेतक-यांसाठी शेतकरी मेळावे अयोजीत करून तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, बि-बियाणे महोत्सव, सर्व सामान्य सभासदाला वाचनाची आवड लागावी यासाठी समाज प्रबोधन, सार्वजनीक वाचनालयास संस्थेने पुस्तके भेट दिलेली आहेत. अशा अनेक उपक्रमातुन शेतकरी,कष्टकरी, शेतमजुर यांचे हित साधण्याचा संस्थेने सातत्याने प्रयत्न केलेला आहे.

       यावेळी चेअरमन अजित थोरात यांचा श्री. पी. जी. पाटील यांच्या हस्ते तर व्हा. चेअरमन चंद्रकांत टंकसाळे यांचा दत्तात्रय लावंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे सर्व संचालक व सेवक वर्ग उपस्थित होता.

          संस्थेच्या सन २०२२-२०२३ ते २०२७-२०२८ या कालावधीकरिता निवडूण आलेले नवनिर्वाचीत संचालक अरूण हणमंत पवार, सुहास आनंदराव जाधव, अजित जोतिराम थोरात, चंद्रजीत पांडुरंग पाटील, शामराव सखाराम पवार, भिमाशंकर इराप्पा माऊर, चंद्रकांत सखाराम टंकसाळे, अनिल कृष्णा शिर्के, अरूणादेवी विठठ्लराव पाटील, मंगल अशोक कुंभार, संभाजी शंकर वाघमारे, अविनाश हणमंत पाटील व विठठ्ल दादु येडगे यांची निवड झालेली आहे.