आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे कामकाज कोर बँकिंग प्रणाली पद्धतीने सुरू : चेअरमन अभिजीत पाटील.


आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या डिजीटल बँकिंग सेवेच्या शुभारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, चेअरमन अभिजीत पाटील, संचालक व इतर मान्यवर.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य आर्थिक पतसंस्था म्हणून आनंदराव चव्हाण पतसंस्थेची ओळख निर्माण झाली असून ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा मिळण्याच्या दृष्टीने नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असून संस्थेचे कामकाज कोर बँकिंग प्रणाली पद्धतीने सुरू आहे असे मत संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.

मुंद्रुळकोळे ता. पाटण येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत मोबाईल बँकिंगचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, चेअरमन अभिजीत पाटील, व्हा. चेअरमन आर. बा. पाटील, संचालक बबनराव सुर्यवंशी, शांताराम पाटील, सर्जे राव पाटील, पांडुरंग पुजारी, सुरेश मोहिते, दिनकर साखरे, संचालिका शारदा गरुड, चौगुले सॉप्टवेअरचे प्रमुख रविंद्र चौगुले, व्यवस्थापक सुहासचंद्र पाटील, भानुदास यादव यांची उपस्थिती होती.  

यावेळी अभिजीत पाटील म्हणाले सहकार खात्याच्या नियमानुसार संस्थेचे कामकाज सुरु असून संस्थेच्या ग्राहकांना डिजीटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचा क्यु. आर. कोड, मोबाईल बँकिंग अँप, नीट, आर.टी.जी.एस, आय. एम. पी. एस, एस. एम. एस. आदी सुविधा सुरु आहेत. ११ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर सेवा मिळत असल्याने ग्राहकांचा दिवसेंदिवस संस्थेकडे कल वाढत आहे त्यादृष्टीने व ग्राहकांच्या मागणीनुसार ही सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे संस्थेचे संस्थापक हिंदूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे असेही म्हणाले उपव्यवस्थापक प्रदिप पाटील यांनी स्वागत केले. ऑफिस अधिक्षक आनंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.

संस्थेने मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १४५ कोटी व्यवसायाचा टप्पा ओलांडला असुन ८५ कोटी ८१ लाख १० हजार ठेवी, जमा करून ५९ कोटी २० लाख ५८ हजार एवढे कर्ज वितरण केले आहे. २२ कोटी ८३ लाख ८१ हजार एवढी गुंतवणूक आहे. ८५ लाख ७१ हजार एवढा ढोबळ नफा झाला आहे. तर ५५ लाख ४ हजार निव्वळ नफा आहे. संस्थेचे भाग भांडवल ३ कोटी १ लाख ७ हजार एवढे आहे