रविवारी अजित पवार पाटण तालुक्यात..

गुढे (तळमावले) येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा.



पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: रविवार दि. २८ मे रोजी पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुढे (तळमावले) येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे . या मेळाव्यास राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी उप मुख्यमंत्री अजितदादा पवार , विधानपरिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर , खासदार श्रीनिवास पाटील , माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर , माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील , माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.     

          या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की या मेळाव्याला आ.मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण , सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, दिपक पवार, माजी आमदार प्रभाकर देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर , राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील, राजेश पाटील आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत . यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुंभारगाव - ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे . 



     या मेळाव्यास पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी , सर्व आजी ,माजी जि.प. व पं.स. सदस्य , नगराध्यक्ष, नगरसेवक , सरपंच , उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व संस्थाचे चेअरमन , व्हा. चेअरमन , संचालक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही शेवटी राजाभाऊ शेलार यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन राजे संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष योगेश पाटणकर व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रमेश मोरे बापू यांनी केले आहे.