पत्रकारितेतील विशेष सामाजिक कार्याबद्दल भिमराव धुळप यांचा चंद्रभागा आयकॉन २०२३ देऊन सन्मान.


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि चंद्रभागा रूरल डेव्हलपर्स आयोजित चंद्रभागा आयकॉन २०२३ पुरस्कार सोहळा कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) संपन्न झाला. यावेळी धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप यांनी केलेल्या रुग्णांना वैधकीय मदत,दिव्यांग बांधवांना केलेली मदत तसेच अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रम मध्ये केल्या सामाजिक कार्याबद्दल चंद्रभागा आयकॉन पुरस्कार २०२३ पत्रकारिता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे भूमाता ब्रिगेटच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई देसाई,सिनेअभिनेत्री सुरेखा कुडची,सुनंदा शेंडे यांच्यासह सातारा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदय दादा पाटील,युवानेते इंद्रजित चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

  तसेच व्यसनमुक्ती आणि पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल डॉ संदीप डाकवे,पै.तानाजी चवरे, ग्रामपंचायतील विशेष योगदान बद्दल प्रशांत सुकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.