शेंडेवाडी जळीतग्रस्त कुटुंबांना कुंभारगांव वि.का.स सेवा सोसायटीच्या माध्यमातून धान्य व लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याकडून आर्थिक मदत.


कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
शेंडेवाडी - कुंभारगाव (ता. पाटण) येथे जळीतग्रस्त चार कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य आगीत जळून भस्मसात झाले. त्या जळीतग्रस्त कुटुंबांना शासकीय कोठ्यातून कुंभारगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून जीवनावश्यक अन्नधान्याची मदत करण्यात आली तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्या कडूनही या कुटुंबासाठी आर्थिक करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत शेंडेवाडी ता. पाटण येथील चार पवार कुटुंबांच्या सर्व सामान व अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याची राख झाली. त्यात १६ लाखांचे नुकसान झाले होते..



या कुटुंबीयांना प्रथम प्राधान्याने अन्न धान्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने कुंभारगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या शासकीय कोट्यातून प्राथमिक मदत म्हणून सेवा सोसा. च्या माध्यमातून कुंभारगांव / शेंडेवाडीच्या गांव कामगार तलाठी के डी, मुळे यांच्या उपस्थितीत १५० किलो गहू व तांदळाची मदत देण्यात आली. 
यावेळी सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार, संचालक राजेंद्र पुजारी व  जळीतग्रस्त  उपस्थित होते.

लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्याच्या वतीने त्या ४ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे ४० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. या वेळी शेंडेवाडी सरपंच राहुल मोरे, उपसरपंच बाबासो मोरे, गलमेवाडी माजी सरपंच दत्तात्रय चोरगे, महेश चोरगे, जनविकास पतसंस्थेचे चेअरमन बाळकृष्ण काजारी,मर्चन्ट सिंडिकेट चे चेअरमन अनिल शिंदे, पाटण बाजार समितीचे संचालक धनाजी गुजर,गलमेवाडी ग्रा,पंचायत सदस्य धोंडीराम चोरगे,गव्हर्मेंट कॉट्रॅक्टर धनाजी चाळके,सचिन यादव, चाळकेवाडीचे सरपंच अशोक खाशाबा चाळके, बाळू चाळके,चाळकेवाडी शिवसेना शाखा प्रमुख मारुती निवडुंगे, चाळकेवाडी ग्रामपंचायत सदस्य अशोक तुकाराम चाळके, कुंभारगांव वि, का, सेवा सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार, शिवदौलत बँकेचे संचालक मधुकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.