शेंडेवाडीत चार घरांना भीषण आग घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही.

 


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीवरून शेंडेवाडी कुंभारगाव ता पाटण येथील हरिबा ज्ञानदेव पवार,रघुनाथ बाबुराव पवार, दादू सखाराम पवार, शामराव सखाराम पवार अशी चार कुटूंबे राहत असून त्यापैकी दोन कुटूंबे तळमावले येथे अन्य एक मुबई या ठिकाणी राहत असून आज सकाळी त्यांच्या राहत्या घरांना भिषण आग लागली.

 या वेळी घरात दादू सखाराम पवार, हिराबाई दादू पवार, सुरेश शामराव पवार, संतोष शामराव पवार (पोलीस पाटील )उपस्थित होते. या वेळी अचानक घरातून धुराचे लोट येऊ लागले व आगीने रोद्र रूप धारण केले यावेळी संतोष पवार (पोलीस पाटील )यांनी कराड नगरपालिकेच्या,व पाटण अग्निशामक दलास या घटनेची माहिती दिली तत्पूर्वी हि आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य स्थानिक नागरिकांनी केले या आगीत संसार उपयोगी भांडी धान्य कपडे जळून गेले तसेच वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखून घरात असणारे गॅसचे सिलेंडर बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.या आगीत अंदाजे पंचवीस लाखाचे नुकसान झालेची माहिती पोलीस पाटील संतोष पवार यांनी कृष्णाकाठ शी बोलताना दिली. आग नेमकी कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही अग्निशामक दलाच्या दोन गाड्या 11,30 वाजता घटनास्थळी दाखल झाल्या यावेळी अग्निशामक दलाने लागलेली आग विजवण्यात आली या घटनेची माहिती ढेबेवाडी पोलीस स्टेशनला फोनवरून दिल्याचे सांगण्यात आले.