प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांच्या ‘यशवंत’ गौरव ग्रंथांचे 8 मे रोजी प्रकाशनतळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

ख्यातनाम वक्ते, सुप्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांचा सपत्नीक सेवागौरव व 'यशवंत’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा सोमवार दि. 8 मे, 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आ.अजित पवार यांच्या हस्ते, खा.श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे विद्यार्थी उत्कर्ष प्रतिष्ठान सातारा, तळमावले, तासगाव व संस्कृती प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास खा.श्री.छ.उदयनराजे भोसले, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.मकरंद पाटील, आ.सुमनताई पाटील व रोहित आर.आर.पाटील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै.‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील, मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनीताराजे पवार, सातारा मराठा विद्या प्रसारक मंडळांचे चेअरमन जयेंद्र चव्हाण आदि प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे विद्यार्थी उत्कर्ष प्रतिष्ठान सातारा, तळमावले, तासगाव व संस्कृती प्रकाशन पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.