कुंभारगाव येथे घरफोडी; सोने व घर साहित्य लंपासकुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगाव ता.पाटण येथील बंद घरातून चोरी झाल्याचे समजले आहे. घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती वरून कुंभारगाव ता पाटण येथील संतोष गुलाब मोहिते हे पंजाब येथे चांदी आटनी चा व्यवसाया करिता वीस वर्षांपासून पंजाब येथे राहतात. 
वर्षातून एकदा गावी येत असतात त्यांचे गावी कुंभारगावला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी नजीक घर असून शेजारी अन्य तीन घरे आहेत मागील दोन दिवसात या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या वेळी बेडरूम मधील साधारण चार ते पाच तोळे सोने, 55 इंची एलसिडी फोडून लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. तर चोरट्यांनी नवीन कुलपे दरवाज्यांना लावल्याची माहिती त्यांचे बंधू मधुकर मोहिते यांनी दिली. 
या घटने बाबत ढेबेवाडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्या बाबत ढेबेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज