तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा
घराळवाडी ता कराड येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे रविवार दि 09 एप्रिल 2023 रोजी सकाळी SSC मार्च 1987 ते 2013 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना विध्यालयाशी असलेला ऋणानुबंध वृंदिगत करण्याची संधी मिळणार आहे असे आव्हान स्कुलच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्नेह मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणुन विकास सेवा सोसायटी येवतीचे चेअरमन एम डी घराळ, तर प्रमुख पाहुणे म्हणुन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सारंग पाटील, अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाशजी रामिष्टे, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील( दादा) , प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक पोपटराव काटकर यांची उपस्थिती असणार आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या प्रांगणात हा स्नेह मेळावा संपन्न होणार आहे असे न्यू इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक, शालेय स्कुल कमेटी यांच्या वतीने प्रसिद्ध पत्रिके द्वारे सांगण्यात आले आहे.