विशाल पडवळ यांची नवी मुंबई पोलिस पदी निवड


पाटण| कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
आत्मविश्वास ,जिद्द, चिकाटी व कष्ट आपल्या जवळ असेल तर आपण करतो हे ज्वलंत उदाहरण म्हणजे विशाल पडवळ या युवकांचे घ्यावे लागेल,या युवकांने घरची हलाखीची परिस्थिती,आईचे छत्र हरपल्यामुळे वडील व्यसनी बनले, आईचे बालपणी छत्र हरपलेले, वयोवृद्ध आजीने कसेबसे पालनपोषण केले. घरचे राहणीमान अगदी साधे, जमीनीचे क्षेत्र अगदी कमी , हातावरती पोट वडील एक मोठा भाऊ खाजगी नोकरी करत होते,परंतू आईच्या आजारपणातील खर्च, घरची बेताची परिस्थिती,आजीचा दवापाणी खर्च,यामुळे तारेवरची कसरत या पडवळ कुटूंबियांना करावी लागत होती.
त्यामुळे विशालला काही काळ पुणे, शिरवळ या ठिकाणी नोकरी करावी लागली, पण नोकरी करत असताना जिद्द मात्र पोलीस होण्याची होती.
त्यामुळे त्याने खाजगी नोकरीला राम राम ठोकला ‌व नोकरी सोडून विशाल हा घरी आला. त्याच्यापुढे आ वासून दु:खाचा डोंगर होता. त्यामुळे त्याला स्वत: हाताने जेवण बनवणे, कपडे हाताने स्वत: धुणे, घरची झाडलोट करणे, पाणी भरणे ही त्याला नित्याचीच कामे करावी लागत होती.
आई नसताना काय यातना होतात ते विशाल पडवळ यांचे कडून शिकावे पण आज जे यश मिळवले आहे आई व आजी, गावातील लहान थोर मंडळी, मित्रपरिवार यामुळे मिळाले.
तसेच येरफळे गावचे आराध्य दैवत श्री वाघजाई देवीचा सदैव आशिर्वाद पाठीशी रहावा असे यावेळी विशाल गावचे ग्रामस्थ मित्रमंडळ यांनी त्यांचा नवी मुंबई पोलिस पदी निवड झालेबद्दल यथोचित सत्कार करतेवेळी म्हणाला यावेळी येरफळे गावचे सरपंच सुनिता पडवळ, उपसरपंच पंढरीनाथ पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन शंकर भिसे, सर्व संचालक मंडळ तसेच अनिल भिसे, संतोष कदम, कृष्णत कदम, साहिल पवार, सौरभ मुगदूम, भरत कदम, कृष्णत पवार , हणमंत पाटील, ह.भ.प.शंकर पाटील, पांडूरंग पाटील, राजेंद्र पवार, राहूल पाटील व विशाल पडवळ यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विशाल पडवळ यांची पोलिस पदी निवड झालेबद्दल ठिकठिकाणी फटाकेची आतिषबाजी तसेच फ्लेक्स ही लावणेत आले होते.