वाझोली चे कुस्ती मैदान अभिजीत भोसले ने मारले.

ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त शंभरपेक्षा जास्त कुस्त्यांचे आयोजन.



कुस्ती लावताना बाळासाहेब पाटील,सुधीर पाटील, तानाजी चवरे आप्पा, गणेश चव्हाण व जयवंत पाटील
वाझोली | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 वाझोली ता.पाटण येथील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे मैदान शितुरच्या च्या अभिजित भोसले याने मारले. त्याने सांगलीच्या भैरव भोसले याला अस्मान दाखवत प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली.  यात्रा कमिटीच्या वतीने प्रथम क्रमांकावर दोन कुस्त्या खेळवण्यात आल्या होत्या या मध्ये शितुरच्या कुमार पाटील ने कोल्हापूरचा पै.गणेश कारंडे यास अस्मान दाखवले. द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत शितुरच्या पै सूरज पाटील याने सांगली येथील प्रताप ठाकूर याला चितपट केले तर तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत प्रदीप पाटील याने सांगलीच्या भैरव भोसले याला चितपट केले. 
दरम्यान वाझोली येथे झालेल्या ३० ते ८० किलो अशा लहान व मोठ्या वजनी गटापर्यंत शंभरपेक्षा जास्त कुस्त्या झाल्या. मोठ्या गटातील विजयी पै सांगलीचा साहिल मोरे, अक्षय तुपे, अभिजित पाटील, मकरंद पाटील, प्रतीक चवरे यांनी विजय प्राप्त केला. तसेच कुठरे येथील पै निलेश पाटील याने ही विजय मिळवत तमाम कुस्ती शौकिनांची मने जिंकली. या कुस्ती मैदानासाठी वस्ताद म्हणून वाझोली, धामणी ,कुठरे सलतेवाडी येथील ग्रामस्थ यांनी पंच म्हणून काम पाहिले ,विविध भागांतील पाहूनेपई व ग्रामस्थ यांनी कुस्ती मैदानासाठी हजेरी लावली. रमेश थोरात सर यांनी कुस्ती समालोचन व सूत्रसंचालन केले. आभार शिवसेना तालुका अध्यक्ष राजेश चव्हाण यांनी मानले