घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५३ वा कला व क्रिडा महोत्सव

 


मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

 चेंबूरच्या सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५३ वा कला व  क्रीडा महोत्सव  महिनाभरापासून विविध स्पर्धांच्या आयोजनाने सुरू आहे.या महोत्सवाची सांगता १ मे महाराष्ट्र दिनी सत्यनारायण महापूजेने होणार आहे. 

बेस्टचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या विशेष पुढाकाराने हा कला व क्रीडा महोत्सव पार पडत असतो.

या मंडळाचे आधारस्तंभ, प्रसिद्ध कला दिग्दर्शक बबन काटवटे असून मंडळाला उद्योजक के.आर.गोपी, प्रसिद्ध डेकोरेटर विलास पाटील,मनोज आशिष पाटील,भूषण पाटील आणि महेंद्र पांचाळ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. 

१ मे रोजी महापूजा आणि खास मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच समाजसेविका मीनाक्षी पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील महिलांसाठी  सायंकाळी ६.३० ते ९ यावेळेत खास हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे विनायक पाटील,किशोर पाटणकर,चारुदत्त ठाकूर आणि सर्व सभासद विशेष मेहनत घेत आहेत.या मंडळाच्या महोत्सवाला सर्वपक्षीय राजकिय नेते, प्रसिद्ध कलाकार,उद्योजक, डॉक्टर आणि सर्व स्तरातील  मान्यवरांची उपस्थिती दिसून येते.