प्राचार्य डॉ.सचिन पाटील यांची शिवाजी विद्यापीठ फार्मसी अभ्यासक्रम मंडळावर निवड


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगावचे प्राचार्य डॉ. सचिनकुमार वसंतराव पाटील यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या फार्मसी अभ्यास मंडळावर सदस्यपदी निवड झाली.

फार्मसीमध्ये विद्यापीठ स्तरावर येणारे नवनवीन बदल, धोरणे, अभ्यासक्रम याबाबत अभ्यास मंडळाची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जागतिक स्तरावर स्पर्धा व विद्यापीठ दर्जा टिकविण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात सातत्यपूर्ण बदल होणे आवश्यक असते. यासाठी येत्या काळांत नवनवीन अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ मंडळीद्वारे शिफारस केलेलाच अभ्यासक्रम विद्यापीठ राबवत असतात. यासाठी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांचे मार्गदर्शन लाभले.