कुंभारगाव येथे लाभार्थींना आनंदाचा शिधा संचाचे वितरण

    


कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

 कुंभारगाव  तालुका पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये नुकतेच जनतेला आनंदाचा शिधा संचांचे वाटप करण्यात आले. 

 सातारा जिल्ह्यात एकूण 3 लाख 87 हजार 441  आनंदाचा शिधा संच प्राप्त झाला त्यातील आनंदाचा शिधा कुंभारगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीला प्राप्त झाला असून त्यांचे नूकतेच बाळासाहेब देसाई सह साखर कारखाना दौलतनगर चे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण,कुंभारगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच  राजेंद्र चव्हाण, विविध का, सेवा सोसायटी चे  चेअरमन  रामराव इनामदार, माजी चेअरमन  भिमराव चव्हाण, संचालक  राजेंद्र पुजारी,  जगन्नाथ देसाई,  रमेश यादव, सद्गुरु वि, का,सेवा सोसायटी चे शंकर मोहिरे सामाजिक कार्यकर्ते  अनिल डांगे,  शिवाजी सुर्वे  यांच्या हस्ते 'आनंदाचा शिधा 'संचाचे लाभार्थींना वितरण करण्यात आले.

 या संचामध्ये प्रत्येकी १ किलो रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर पामतेल यांचा समावेश आहे.  या सोसायटीचे सेल्समन म्हणून विलास मोरे यांची नियुक्ती केली आहे. 

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज