काजल मोरेचे ची सातारा जिल्हा पोलीस पदी निवड.


काजल प्रल्हाद मोरे हिचा सत्कार करताना सरपंच राहुल मोरे, उपसरपंच बाबासो मोरे, दै कृष्णाकाठ प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव पतंगे,वडील प्रल्हाद मोरे, चुलते रघुनाथ मोरे

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागातील शेंडेवाडी येथील काजल मोरे हीची नुकतीच सातारा जिल्हा पोलीस पदी निवड झाली आहे. 

ग्रामीण भागात जन्माला येऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन मनात पोलीस होण्याची इच्छा बाळगून त्या ध्येयाने सातत्याने परिश्रम करून ध्येय प्राप्तीसाठी खडतर कष्ट करून पोलीस पदाच्या निवडीची तयारी करून यश संपादन करणाऱ्या काजल मोरे चे सर्वत्र कौतुक होत आहे.

काजल चे वडील प्रल्हाद मोरे शेती करतात तर आई छाया मोरे घरकाम करत असत. भाऊ रोहित हा मुबई येथे होमगार्ड म्हणून काम करत आहे. अश्या बिकट परिस्थित काजल मोरे हिने परिश्रम घेत 21 व्या वर्षी हे यश संपादन केले आहे.

काजलचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी जि.प. प्राथमिक शाळा शेंडेवाडी, पाचवी ते सातवी जि. प. प्राथमिक शाळा गलमेवाडी, आठवी ते दहावी श्री नाईकबा हायस्कुल गलमेवाडी, पुढील शिक्षण 11 वी 12 वी व पदवी पर्यंत चे शिक्षण काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले येथे सुरू आहे. सध्या काजल पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. 

या दरम्यान भाऊ रोहित यांचे विचाराने प्रेरित होऊन प्रचंड कष्ट, आत्मविश्वास व मेहनतीच्या जोरावर कोणतही इतर मार्गदर्शन न घेता डोंगर दर्यात राहून वयाच्या 21 व्या वर्षी सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये निवड होऊन तिने एक आदर्श निर्माण केला आहे. 

तिच्या या निवडी बद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शेंडेवाडीचे सरपंच राहुल मोरे, उपसरपंच बाबासो मोरे, दै कृष्णाकाठचे प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव पतंगे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.