सावंतवाडी पोलीस पाटील पदी विकास शिरसट यांची निवड

 

 उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
सावंतवाडी (माळवाडी) ता.शिराळा या गावच्या पोलीस पाटील पदी विकास शिरसट यांची नियुक्ती झाली ही निवड  परीक्षेतून करण्यात आली आहे. 

विकास शिरसट यांचे सामाजीक क्षेत्रात फार मोठे काम आहे. यापूर्वी कुस्ती मल्ल विद्या केंद्रा मार्फत तसेच सामाजीक कार्यात उत्सपुर्त असा सहभाग घेत त्यांनी समाजीक बांदीलकी जपलेली आहे. अनेक निराधार महिला पुरुषांना पेन्शन सुरू करण्यासाठी मदत केली आहे. तसेच कोरोनाच्या काळामध्ये अनेक कोरोना रुग्णांना मदत केली आहे. 

तसेच त्यांना समाजकार्याची आवड असल्याने सामाजिक कार्यामध्ये सतत भाग घेत असतात. पंचक्रोशीत त्यांची समजा प्रती असलेली काम करण्याची तळमळ यांची या निवडीने जणु पोच पावती मिळाल्याचे मत त्यांचे निकटवर्ती व मित्र परीवारातुन ऐकण्यास येत आहे.

नुकत्याच घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षे मधुन शिरसट यांची पोलीस पाटील पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.