आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंदुळकोळे (ढेबेवाडी ता. पाटण) या संस्थेने उत्तम ग्राहक सेवा देत प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला असून मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १४५ कोटी ११ लाख ६८ हजार एवढा एकत्रित व्यवसायाचा टप्पा ओलांडून गरुड झेप घेतली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले, सन १९९४ साली ढेबेवाडी सारख्या ग्रामीण भागात संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील यांनी संस्थेची स्थापना करून परिसरातील गोरगरीब लोकांना सावकारी विळख्यातून बाहेर काढले. त्यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेने चालू आर्थिक वर्षांत नेत्रदीपक कामगिरी केली असून संस्थेकडे ८५ कोटी ८१ लाख १० हजार एवढ्या ठेवी जमा झाल्या आहेत. तर ५९ कोटी २० लाख ५८ हजार एवढे कर्ज वितरण केले आहे. संस्थेचे भाग भांडवल ३ कोटी १ लाख ७ हजार एवढे आहे.
संस्थेची गुंतवणूक २२ कोटी ८३ लाख ८१ हजार एवढी आहे. संस्थेकडे रोख व बँक शिल्लक ३ कोटी ४५ लाख ४९ हजार इतकी आहे. संस्थेला ८५ लाख ७१ हजार एवढा ढोबळ नफा झाला आहे.
डोळ्यासमोर ठेवून संस्थेने चालू आर्थिक वर्षांत नेत्रदीपक कामगिरी केली असून संस्थेकडे ८५ कोटी ८१ लाख १० हजार एवढ्या ठेवी जमा झाल्या आहेत. तर ५९ कोटी २० लाख ५८ हजार एवढे कर्ज वितरण केले आहे. संस्थेचे भाग भांडवल ३ कोटी १ लाख ७ हजार एवढे आहे.
संस्थेची गुंतवणूक २२ कोटी ८३ लाख ८१ हजार एवढी आहे. संस्थेकडे रोख व बँक शिल्लक ३ कोटी ४५ लाख ४९ हजार इतकी आहे. संस्थेला ८५ लाख ७१ हजार एवढा ढोबळ नफा झाला आहे.
संस्थेचे ७ हजार एवढे सभासद् आहेत. संस्थेचा निधी १ कोटी ३९ लाख ७५ हजार आहे. संस्थेचा सीडी रेशो ६८.९९% इतका आहे. निव्वळ नफा ५५ लाख ४ हजार एवढा आहे.
संस्थेच्या कराड व पाटण तालुक्यात ११ शाखा व मुख्य कार्यालय कार्यरत असून त्यापैकी ७ शाखा व मुख्य कार्यालय संस्थेच्या स्वतः च्या जागेत आहेत.
ग्राहकांच्या सेवेसाठी संस्थेतील सर्व शाखेत मिनी एटीएम, आरटीजीएस, लाईट बिल स्विकृत केंद्र, चेक क्लिअर अशा ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असून संस्थेचे कामकाज कोअर बँकिंग प्रणाली पध्दतीने सुरु आहे.