श्री मळाई देवी पतसंस्थेचा 226 कोटींचा संमिश्र व्यवसाय व 1 कोटी 83 लाख निव्वळ नफा : शेती मित्र अशोकराव थोरात.


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रक्कम रुपये 226 कोटी रुपयांचे व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संस्थेस सन 2022-2023 या आर्थिक वर्षात रक्कम रुपये 2 कोटी 1 लाखाचा ढोबळ नफा झालेला आहे. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भविष्यातही संस्थेची क्षमता व स्थैर्य असेच भक्कम राहण्यासाठी संस्थेने एनपीए ची 100% तरतूद केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्था लाभांश देणार आहे.असे संस्थेचे व्हाईस चेअरमन सुहास जाधव यांनी नमूद केले.त्याचबरोबर सर्व शाखांमधून लॉकर सुविधा व सोनेतारण सुविधा निर्माण करण्याचा मानस मा. व्हा.चेअरमन यांनी व्यक्त केला.

दरम्यान सहकार खात्याचे असणारे निकष पूर्ण झाल्याने पतसंस्थेने आर्थिक दृष्ट्या सुदृढ आणि स्व नियंत्रित पतसंस्थेचा दर्जा संपादन केलेला आहे. यामुळे पतसंस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सहकार क्षेत्रातील विविध मापदंड पार करीत संस्थेने सातत्यपूर्ण प्रगती साध्य केली आहे. पतसंस्थेने पतदर्शी धोरण तयार करून त्यानुसार वाटचाल केल्यामुळे पतसंस्थेच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली असून पतसंस्था प्रगतीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली आहे. निश्चित ध्येय धोरणे असल्याने प्रगतीमध्ये सातत्य राखणे शक्य झाले आहे. यामध्ये सेवकांचा सातत्यपूर्ण सहभाग ही विशेष बाब आहे.

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेने एकंदर ठेव प्रगतीचा वेग ठेवला असून सी.डी.रेपो 65 % राखला आहे. पतसंस्थेने नफा क्षमता उत्तम ठेवली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सुयोग्य वापराने हे शक्य झाले आहे.

पतसंस्थेने वसुलीच्या आघाडीवर यश संपादन केले असून नक्त एनपीए प्रमाण अल्प राखण्यात यश प्राप्त केले आहे . ग्राहकांना आर्थिक शिस्त लावण्याचे दृष्टीने वर्षभर सातत्याने प्रयत्न करण्यात आले. अडचणी समजून घेऊन वसुली प्रक्रियेतील कटुता टाळण्यात यश आले आहे

संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लावलेले रोपट्याचा वटवृक्ष झालेला आपणास पहावयास मिळत आहे. संस्थेच्या 19 शाखा व मुख्य कार्यालय अशा 20 शाखांमधून सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आज अखेर संस्थेचे 8257 सभासद असून 31 मार्च 2023 अखेर संस्थेकडे 133 कोटी ठेवी असून संस्थेने गरजू लोकांना 93 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. तरलते पोटी संस्थेने विविध बँकांमध्ये 55 कोटी 44 लाख रुपयांची ठेवीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तसेच संस्थेचे वसूल भाग भांडवल 9 कोटी 85 लाख असून आठ कोटी 29 लाख रकमेचे राखीव व इतर निधी संस्थेने उभा केलेला आहे.संस्था सहकार कायद्याप्रमाणे कामकाज करून 2 कोटी 1 लाख रुपयाचा ढोबळ नफा संपादन केलेला आहे.संस्था स्थापनेपासून सतत अ वर्ग संपादन करत आहे.

सर्वांच्या सहकार्याने श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेने अविरत जनसेवेची 36 वर्षे पूर्ण केलेली आहे. संस्थेच्या जीवनातील हा टप्पा पूर्ण करत असताना आपणा सर्वांनाच विशेष आनंद होत आहे. एकूण 68 कर्मचारी कार्यरत असून त्यामुळे तरुणांचा थोड्या प्रमाणात बेकारीचा प्रश्न ही कमी झालेला आहे. संपूर्ण सेवक वर्ग प्रशिक्षित असून त्यांना सहकार क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन घडामोडी माहीत व्हाव्यात म्हणून नेहमी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून यावर्षी दि. 03/03/2023 पासून कोअर बँकिंग प्रणाली लागू केलेली असून सभासदांना ऑनलाइन सेवा उपलब्ध केली आहे.संस्थेचे एकूण शाखांपैकी 17 शाखा स्व मालिकेच्या इमारतीत आहेत तसेच दरवर्षाप्रमाणे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 01 जून 2023 रोजी घेण्याचा मानस आहे.

श्री मळाई देवी पतसंस्था ही मळाई देवीच्या कृपेने, संचालक व सेवकांच्या अथक प्रयत्नाने अधिक प्रगती करून समाजातील गोरगरिबांसाठी आपले कर्तव्य पार पाडतील अशी खात्री आहे.