ढेबेवाडी विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध.२१ वर्षानंतर बिनविरोध सत्तांतर करत शिवसेनेचा भगवा फडकला.

नवनिर्वाचित बिनविरोध संचालकांचा यशराज देसाई यांच्या हस्ते सत्कार संपन्न ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
 ढेबेवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये २०२३-२४ ते २०२७-२८ या कालावधीतील पंचावार्षिक संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध पार पडली असून २१ वर्षानंतर बिनविरोध सत्तांतर करत शिवसेनेचा भगवा फडकला.

 लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांनी दौलतनगर मरळी येथे नवनिर्वाचित बिनविरोध संचालक बाबुराव चंद्रु साबळे, सदाशिव यशवंत साबळे, संतोष तानाजी साबळे, विठ्ठल गणपती पाटील, रमेश अंतू पवार,शंकर गणपती पवार,शशिकांत बंडू कदम, शंकर राजाराम पाटील भाऊ शंकर साबळे,सिताबाई शामराव जाधव,लक्ष्मी प्रल्हाद जाधव यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

 ढेबेवाडी विभागातील विलास गोडांबे शेठ, पंजाबराव देसाई (तात्या), सरपंच बाळकृष्ण काजारी,मारुती पवार, रणजित पाटील, मनोज मोहिते या  पदाधिकाऱ्यांनी सदरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.