पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी, तसेच नैसर्गिक साधन संपत्ती स्त्रोतांच्या योग्य वापरासाठी सोलर सिस्टिम महत्त्वाची : शेतीमित्र अशोकराव थोरात


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित, आदर्श ज्युनिअर कॉलेज व आ.च. विद्यालय मलकापूर ता. कराड येथे रूप टॉप सोलर सिस्टिमचा हस्तांतरण सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी वरील उद्गार काढले. पुढे ते म्हणाले, समाजातील दातृत्व असणाऱ्या व्यक्ती, कंपन्या यांचे माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या संस्था, शाळांना मदत मिळणे ही मोठी आनंदाची बाब आहे. त्यामध्ये आम्हाला वीर बॅक ऍनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या सामाजिक विकास कार्यक्रमांतर्गत रूप-टॉप सोलर सिस्टिम मिळाले त्याबद्दल कंपनीचे आम्ही ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले.

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पशु संवर्धन सहाय्यक आयुक्त दिनकर बोर्डे हे होते. ते म्हणाले निसर्गनिर्मित ऊर्जा स्त्रोताचा वापर केल्यास मानवनिर्मित कष्ट, पैसा यांची बचत होते. याचा समाजातील लोकांनी बोध घ्यावा.

      वीर बॅक ऍनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे रिजनल बिजनेस मॅनेजर श्री विजय कुंभार म्हणाले, सोलर सिस्टिममुळे वीज निर्मिती होऊन शालेय अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो. त्याच उदात्त हेतूने या उपक्रमांतर्गत विद्यालयात रूप-टॉप सोलर सिस्टिम राबविला असल्याचे त्यांनी सांगितले.

       वीज बचत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वीज निर्मिती करिता निसर्गातील साधन संपत्तीच्या स्त्रोतांचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने वीर बॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या सामाजिक विकास कार्यक्रमांतर्गत रूप टॉप सोलर सिस्टिमचा विद्यालयास प्रदान करण्यात आल्याचे कंपनीचे पदाधिकारी यांनी सांगितले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अरुणा कुंभार यांनी केले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सौ शीला पाटील यांनी मानले.

कार्यक्रमास वीर बॅक ऍनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी राहुल दडस,बाबासाहेब वरपे, विनोद माने, सुमित भिलारे, अक्षय घोरपडे, अमित देशपांडे, संजय तडाखे, शेखर शिर्के, विश्वास निकम, दादासो गरुड, पी.जी.पाटील, बी बी पाटील, तुळशीराम शिर्के, डॉक्टर स्वाती थोरात, वसंतराव चव्हाण, संजय थोरात, उप मुख्याध्यापक ए बी थोरात पर्यवेक्षक बी जी बुरुंगले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते.