वेदनाग्रस्तांना 'एमडी, एमएस'ची उब

तांबव्यात आरोग्य शिबिराला प्रतिसाद; 'स्व. सुशीला पाटील संस्थे'तर्फे आयोजनतांबवे : आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी (डावीकडून) संदीप कोलते, डॉ. महेश खुस्पे, डॉ. सुशीलकुमार घार्गे, डॉ. किरण घार्गे, डॉ. प्रज्योत माने, अंकिता कदम, नयना खबाले- पाटील, सविता पाटील.

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा 
डॉक्टर, आम्हाला खूप वेदना होतायंत, आजार खूप वाढलाय, शहरात जाणं होत नाही, बरं झालं तुम्ही आमच्यासाठी देवासारखं आलाय, आता आम्हीबी उपचार घेवून बरं होवू... अशी भावना अनेक वेदनाग्रस्त, आजारग्रस्तांनी व्यक्त केली. एमडी, एमएस शिक्षण झालेल्या डॉक्टरांनीही त्यांच्यावर आपुलकीने उपचार करत मायेची उब दिली. 

निमित्त होते, स्व. ज्ञानदेव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे तांबवे, ता. कराड येथील गांधी चौक येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे. डॉ. सुशीलकुमार घार्गे (एमडी मेडिसीन), बालरोगतत्ज्ञ डॉ. किरण घार्गे (एमडी), पोटविकारतत्ज्ञ डॉ. प्रज्योत माने (एमएस) यांनी सुमारे १५० हून अधिक रुग्णांवर मोफत उपचार केले. यास लायन्स क्लब ऑफ कराड सिटी, आगाशिवनगर, ता. कराड येथील समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी यांचे सहकार्य लाभले.

कोटा अकॅडमीचे संस्थापक, इंटरनॅशनल लायन्स क्लबचे रिजनल मॅनेजर डॉ. महेश खुस्पे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संदीप कोलते, संस्थेच्या अध्यक्षा नयना खबाले- पाटील, उपाध्यक्ष सविता पाटील, अंकिता कदम, डॉ. अविनाश नांगरे, डॉ. एस. के. पाटील, दादासो ढगाले, संस्थेचे सभासद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच डॉ. घार्गे, डॉ. माने यांनी मधुमेह, रक्तदाब, पोटाचे विकार, त्वचा विकार, सांधेदुखी यासह विविध आजारग्रस्तांवर उपचार केले. डॉ. किरण घार्गे यांनी असलेल्यांना औषधोपचारही करण्यात आले. 

डॉ. अविनाश नांगरे यांनी मार्गदर्शन केले. पत्रकार विशाल पाटील यांनी प्रास्ताविक केले. सागर पाटील, कु. संध्या पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल काटवटे यांनी आभार मानले. 

__________________________________

स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुद्देशीय सामाजिक संस्था समाजहिताचे सातत्याने उपक्रम राबवत आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उचलेली पाऊले स्त्युत्य आहेत. भविष्यात या संस्थेने शिक्षण क्षेत्रात काम करावे.
- डॉ. महेश खुस्पे
__________________________________