श्री संतकृपा डी फार्मसी मध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन


घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) येथे एस.के.एस. बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सातारा सांगली कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. डिप्लोमा इन फार्मसी स्पोर्ट असोसिएशन व एस.के.एस. फार्मा स्पोर्ट व आय.पी.ए.- ए.पी.टी.आय. यांच्या सहयोगाने ही स्पर्धा या महाविद्यालयामध्ये पार पडली.

या स्पर्धेत मुलींच्यामधून अंजली मोरे एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी तासगाव या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक, सारिका पाटील संत गजानन महाराज फार्मसी महागाव या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक तर प्रथम क्रमांक शितल माळी एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी तासगाव हिचा आला.

तर मुलांमधून विशाल नेटके सावकार फार्मसी कॉलेज जयतापुर (सातारा) याचा तृतीय क्रमांक, प्रसाद शिंदे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव या विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक तर प्रथम क्रमांक मारुती नराटे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी आष्टा या विद्यार्थ्यांचा आला.

या स्पर्धेचे प्रशिक्षक म्हणून प्रा. प्रसाद पात्रेकर व प्रा. अरविंद पाटील व शाहरुख कुरणे यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्राचार्य एन. बी चौगुले प्राचार्य प्रसाद पात्रेकर प्रा. शुभांगी पाटील यांची होती. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा भोसले व प्रा. प्रियांका आलेकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मोनिका चवरे व प्रा. प्रियांका माळी यांनी केले.

  संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.