अभिनेत्री गौरी सावंत यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर



तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा

कलेच्या विविध क्षेत्रांत काम करत असलेल्या अभिनेत्री गौरी सावंत यांना ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बीबीसी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा "साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम संसारे यांनी दिले आहे. अभिनेत्री गौरी सावंत ह्या मुळच्या पाटण तालुक्यातील खळे गावातील शिद्रुकवाडी च्या असून कलाक्षेत्रात वाव मिळावा म्हणून त्या पुणे येथे असतात. अनेक वर्षांपासून त्यांनी कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ही त्यांची वाटचाल सरळ साधी नसतानाही अनेक संकटाना आव्हान देत आणि परिस्थितीचा सामना करत त्यांनी कला क्षेत्रात कलेच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनी पुरस्कारा संबंधी बोलताना हा पुरस्कार माझ्या नावाने असला तरी हा माझ्या सातारा जिल्ह्यातील तमाम बंधू भगिनीचा असून मला याचा आनंद आहे. शिर्डी येथे दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून साईच्या नावाने दिला जाणारा "साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे. अभिनेत्री गौरी सावंत यांच्या निवडीचे भारतीय लहुजी सेनेचे नगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शांतवन

खंडागळे, प्रवरासंगमचे माजी सरपंच सुनिल राव बाकलीवाल, शिवसेनेचे संघटक अंबादास राजे लष्करे, आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले, सिने अभिनेत्री वंदना गव्हाणे, फिल्म डायरेक्टर पांडुरंग गोरे तसेच प्रेम चित्रपटातील कलाकारांनी अभिनंदन केले आहे,