ना.शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्याचे आमदार व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणात वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगीतले.

गेल्या दोन-तीन दिवसांत संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ट्वीट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

यात ते म्हणतात, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. 

गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो.