माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त (17 मार्च) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा वाढदिवस दि.17 मार्च 2023 रोजी प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. 

या दिवशी आ. पृथ्वीराज बाबा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पाटण कॉलनी, कराड येथील निवासस्थानी शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 ते 7 यावेळेत शेती उत्पन्न बाजार समिती, बैलबाजार मैदान, मलकापूर रोड, कराड येथे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या मैदानास भेट देऊन उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी 7.00 ते रात्री 9.45 पर्यंत मलकापूर येथील भारती विद्यापीठ मॅनेजमेंट कॉलेज, NH-4 डी-मार्ट शेजारी, मलकापूर येथे कार्यकर्त्यांचा "सहपरिवार प्रेरणा स्नेह मेळावा" आयोजन केले आहे. याठिकाणी आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) कार्यकर्त्यांच्या कडून शुभेच्छा स्वीकारणार आहेत व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 

यावेळी आ.पृथ्वीराज बाबा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ ऐवजी शालेय उपयोगी साहित्य आणावे जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना त्या शालेय साहित्याचा उपयोग होईल. असे आवाहन कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.मनोहर शिंदे व श्री.इंद्रजित चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.