सांगली कराड ची तुतारी,शंखनाद निनाद घुमला राजस्थान मध्ये.

जगप्रसिद्ध तुतारी वादक पांडुरंग शंकर गुरव, कृष्णत काकासाहेब गुरव(कार्वे.कराड), शंख वादक पांडुरंग बापू पाटील व ढोलकी वादक शुभम सावंत महाड (रायगड )यांचा सत्कार करताना वाद्य संशोधक विकास कोकाटे सर मुंबई विद्यापीठ

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

संस्कृति मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित राष्ट्रीय संस्कृती महोत्सव भारतीय संस्कृती विरासत का उत्सव डॉ.करणी सिंह स्टेडियम बिकानेर राजस्थान येथे उत्साहात पार पडला. 

 सदर कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील कार्वे गावचे  तुतारी वादक कृष्णत काकासाहेब गुरव तसेच सांगली जिल्ह्यातील वाटेगाव चे जगप्रसिद्ध तुतारी वादक पांडुरंग शंकर गुरव तसेच गिरजावडे गावचे उत्कृष्ट शंख वादक पांडुरंग बापू पाटील यांनी शंखनाद करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

 या अगोदर याच तुतारीने परदेशात दुबईमध्ये तुतारीचा निनाद घुमवला  होता आता मात्र पर  राज्यातही डंका व निनाद होत आहे. 

 यावेळी हजारोंच्या संख्येने राजस्थान मधील कलाकार उपस्थित होते. यावेळी मा. राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ग्रुप लीडर विकास कोकाटे मुंबई विद्यापीठ लोक कला अकादमी वाद्यांचे संशोधक यांचा सन्मान केला.

   कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते होली के रंग संस्कृति के संग लोक नृत्य प्रस्तुती निर्देशन तनेराज सिंह सोढ़ा  म्युझिकल कॉन्सर्ट सलमान अली, इंडियन आयडॉल विजेता उपस्थित होते.