पाटण तालुक्यात गोळीबार..! दोघेजण जागीच ठार.. एक जण गंभीर जखमी..पोलीस घटनास्थळी दाखल..हल्लेखोर मदन कदम पोलिसांच्या ताब्यातपाटण |कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबाराची घटना घडली आहे.
या गोळीबारात दोघेजण जागीच ठार झाले असुन व एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व हल्लेखोर मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा होत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील मोरणा विभागात शीद्रुकवाडी येथे गुरेघर धरण परिसरात गोळीबार झाल्याने पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण पसरले आहे हल्लेखोर मदन कदम यांनी गोळीबार केला असून या गोळीबारात दोघेजण जागीच ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हल्लेखोर मदन कदम याला ताब्यात घेतले आहे दरम्यान हल्लेखोर मदन कदम हे ठाणे शहरातील माजी नगरसेवक असल्याचे समजते. या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. व्यक्तिगत कारणातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.